Logo

शुभमंगल मल्टिस्टेट

स्मार्ट बँकिंग

पेपरलेस बँकिंग

आमचे ग्राहक नेहमीच जगाप्रमाणे अपडेट असावे व येणाऱ्या आधुनिक क्रांतीसाठी ते तयार असले पाहिजे या हेतूने संस्थेने नेहमीच काळाची गरज ओळखून पाऊले उचलली आहे. संस्थेच्या खातेदारांना NEFT / RTGS / IMPS सुविधा, DD, चेक क्लिअरन्स सुविधा, भारतात कुठेही पैसे पाठविण्याची आणि स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. आधुनिक बँकिंगचा जास्ती-जास्त खातेदारांनी लाभ घ्यावा यासाठी पुढील सुविधा पुरविल्या जातात.

Paperless Banking

मोबाईल बँकिंग

ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व रोकड विरहित (कॅशलेस) व्हावे यासाठी शुभमंगल मल्टिस्टेट मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे. याद्वारे ग्राहक त्याच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो. हे मोबाईल अँप वापरण्याकरता अत्यंत सोपे आहे तसेच कुठल्याही अडचणीकरता संस्थेच्या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधून ग्राहकांना बोलता येते.

Mobile Banking

इंटरनेट बँकिंग

आजकाल कोणालाही इंटरनेट शिवाय एक दिवस काढणे अवघड आहे, इंटरनेट मनोरंजनाबरोबर त्याच्या दैनंदिन कामातही महत्वाचा घटक आहे. आमचे अनेक ग्राहक नोकरदार आहेत व त्यांना छोट्या-मोठ्या कामाकरिता संस्थेत येणे शक्य होत नाही, त्यांच्या करता शुभमंगल मल्टिस्टेटची इंटरनेट बँकिंग सुविधा महत्वाची ठरते. या द्वारे ग्राहक सर्व प्रकारची कामे घर अथवा ऑफिस मधून त्याच्या वेळेनुसार सहजपणे करू शकतो.

Internet Banking

MISS CALL बँकिंग

ग्राहकांकडे स्मार्ट फोन अथवा इंटरनेट नसेल तर MISS CALL बँकिंग ही सुविधा उपयोगी ठरते. यामध्ये तुम्ही खात्यातील शिल्लक फक्त 7755905555 या नंबरवर मिस कॉल करून तपासू शकता. ग्राहकांकडे स्मार्ट फोन अथवा इंटरनेट नसेल तर MISS CALL बँकिंग ही सुविधा उपयोगी ठरते. यामध्ये तुम्ही खात्यातील शिल्लक फक्त 7755905555 या नंबरवर मिस कॉल करून तपासू शकता.

SMS Banking

आधार बँकिंग

आधार बँकिंग ही सर्वात सोपी व सुरक्षित आधार संलग्न पेमेंट सुविधा आहे. तुम्हाला दुकानदाराला पैसे द्यायचे असतील, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करायचे असतील किंवा काढायचे असतील, लाईट बिल, फोन बिल इत्यादी. तुमच्या अंगठ्याच्या मदतीने तुम्ही सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहार करू शकता. तुम्हाला फक्त दुकानदाराच्या AEPS मशीनवर तुमचा अंगठा ठेवायचा आहे, तुमच्या आधार संलग्न बँकेची निवड करायची आहे आणि मशीनमध्ये रक्कम जमा करायची आहे, रक्कम तात्काळ दुकानदाराच्या खात्यात जमा होईल.

Aadhar Banking

Copyright © 2025 Shubhmangal Multistate | Designed and Developed by Pressbuddy Software solutions, Pune